FRESH BOOK TITLES IN THE SHOP

NEW ARRIVALS

Checkout Now!

Books

फिडे महिला ग्रँड प्रिक्स पुणे - दिव्या देशमुखचे दमदार पुनरागमन, हम्पीचा सलग दुसरा विजय

by Vivek Sohani - 18/04/2025

IM दिव्या देशमुख हिने FIDE पुणे ग्रँड प्रिक्सच्या चौथ्या फेरीत IM मेलिया सॅलोमी (जॉर्जिया) हिच्यावर मात करत विजयी पुनरागमन केले. ही लढत मेजर पीस एंडगेममध्ये गेली, जिथे दिव्याला तिच्या प्रतिस्पर्धीच्या चुकांची वाट पाहावी लागली. GM कोनेरू हम्पी हिने सलग दुसऱ्या फेरीत विजय मिळवत IM पोलिना शुवालोवा हिचा पराभव केला. हम्पी आणि दिव्या दोघींचेही आता ४ पैकी ३ गुण झाले आहेत. त्या दोघी GM झू जायनर (चीन) हिच्या मागे अर्ध्या गुणाने आहेत. झू जायनरने IM अलीना काशलिंस्काया (पोलेण्ड) हिला पराभूत करत आघाडी कायम ठेवली आहे. GM हरिका द्रोणावल्ली आणि GM आर वैशाली यांच्यातील सामन्यात बरोबरी झाली. IM नुर्ग्युल सलीमोव्हा (बुल्गेरिया) हिने या स्पर्धेतील आपला पहिला विजय IM बाथखुयाग मंगुंतुल (मंगोलिया) हिच्यावर नोंदवला. पाचवी फेरी आज दुपारी ३ वाजता (IST) सुरू होणार आहे. फोटो : अनमोल भार्गव



झु जायनरची ३.५/४ गुणांसह आघाडी कायम

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ह्या स्पर्धेत दुसऱ्यांदा ४/५ डाव निकाली लागले.

दिव्या देशमुख हिने तिसऱ्या फेरीतील पराभवानंतर चौथ्या फेरीत विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे

चीनची झु जायनर ३.५/४ गुणांसह आपली आघाडी कायम ठेऊन आहे

मेलिया - दिव्या ०-१

IM दिव्या देशमुख (रेटिंग 2460) हिने IM मेलिया सॅलोमी (जॉर्जिया, रेटिंग 2293) हिच्याविरुद्ध पहिल्यांदाच खेळले. हा सामना क्वीन आणि दोन रुक्सच्या एंडगेमपर्यंत गेला, जिथे दिव्याने सातत्याने दबाव ठेवत खेळ सुरु ठेवला आणि परिणामी अखेरीस तिच्या प्रतिस्पर्धीने चूक करत सामना गमावला.

IM दिव्या देशमुख हिने IM मेलिया सॅलोमी (जॉर्जिया) हिच्यावर मात केली.

पोलिना - हम्पी ०-१

GM कोनेरू हम्पी (रेटिंग 2528) हिने यापूर्वी IM पोलिना शुवालोवा (रेटिंग 2500) हिच्याविरुद्ध दोन क्लासिकल रेटेड सामने खेळले असून, दोन्ही बरोबरीत संपले होते. मात्र, यावेळी हम्पीने डबल रुक एंडगेममध्ये क्विनसाइडवर दोन जोडलेले पासर तयार केले आणि त्याचा योग्य फायदा घेत विजय मिळवला.

Interview with GM Koneru Humpy | Video: FIDE

हंपीने सलग दोन डाव जिंकत आपले स्पर्धेतील आव्हान ३/४ गुणांसह कायम ठेवले आहे

हरिका आणि वैशाली यांच्यातील सामना बरोबरीत संपला
नुर्ग्युल सालीमोव्हाची फिडेने प्रसारित केलेली मुलाखत

IM बाथखुयाग मंगुंतुल (मंगोलिया) हिला आपल्या संधीचं सोनं करता आलं नाही, प्रतिस्पर्धी IM नुर्ग्युल सलीमोव्हा (बुल्गेरिया) हिने खेळात अप्रतिम उलथापालथ करत स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला.
झु जायनरची फिडेने प्रसारित केलेली मुलाखत

GM झू जायनर (चीन) हिने IM अलीना काशलिंस्काया (पोलंड) हिच्यावर सहज विजय मिळवत ३.५/४ गुणांसह आपली एकहाती आघाडी कायम राखली आहे.

फिडेकडून प्रसारण होत असलेली लाईव्ह कोमेंट्री परत बघण्यासाठी :

फिडेकडून प्रसारण होत असलेली लाईव्ह कोमेंट्री परत बघण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करू शकता

बक्षिसे :

एकूण बक्षीस निधी €80,000 इतका आहे. त्यापैकी पहिले तीन क्रमांकाचे बक्षिसे अनुक्रमे €18,000, €13,000 आणि €10,500 आहेत. तसेच टॉप तीन ग्रँड प्रिक्स पॉइंट्स पुढीलप्रमाणे आहेत: पहिला क्रमांक: 130 गुण, दुसरा क्रमांक: 105 गुण, तिसरा क्रमांक: 85 गुण

स्पर्धेचे वेळापत्रक

ही स्पर्धा 14 एप्रिल 2025 पासून 23 एप्रिल 2025 पर्यंत होणार आहे. शनिवार, 19 एप्रिल हा एकमेव विश्रांतीचा दिवस असेल.




Contact Us